‘रामायण’नंतर आता T-सीरिजच्या ‘हनुमान चालीसा’नं बनवलं ‘हे’ रेकॉर्ड ! भूषण कुमारनं काढली वडिलांची आठवण

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडऊनमध्ये रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेनं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. यानंतर आता टी सीरिजवरील हनुमान चालीसाच्या व्हिडीओनं देखील असाच कारनामा केला आहे. युट्युबवर एक बिलियन व्ह्युज मिळवणारं हा पहिला डिवोशनल व्हिडीओ बनला आहे.

https://twitter.com/itsBhushanKumar/status/1265571477329522688?s=20

टी सीरिजचे स्वामी भूषण कुमार यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, “टी सीरिज कुटुंबासाठी आज आनंदाची वेळ आहे. आपला हनुमान चालीसाचा व्हिडीओ युट्युबवर 1 बिलियनहून अधिक व्ह्युज मिळवणारा पहिला डिवोशनल व्हिडीओ बनला आहे. डॅड तुमचा आशीर्वाद असाच कायम राहू द्या. असेच अनेक टप्पे गाठण्यासाठी आमच्यासोबत रहा.

ज्या व्हिडीओनं हे रेकॉर्ड केलं आहे तो व्हिडीओ 2011 म्हणजेच 9 वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. हरिहरण यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. ललित सेन आणि चंदर यांनी या गाण्याल संगीतबद्ध केलं होतं. तुलसी दास यांनी हनुमान चालीसाची रचना केली होती. हनुमान चालीसाचा हा व्हिडीओ टी सीरिजच्या भक्ती सागर या चॅनलवर अपलोड करण्यात आला होता. या अल्बमचं नाव हनुमान चालीसा-हनुमान अष्टक आहे.