दीपिका पादुकोणचं नाव ड्रग प्रकरणात समोर आल्यानंतर व्हायरल झाले अनेक फोटो, ट्विटर बॉयकॉटची केली मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –    दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात अनेक अँगल समोर येताना दिसत आहेत. त्याच्या मृत्यूला तीन महिने झाले. अशा तीन गोष्टी या तीन महिन्यांत समोर आल्या ज्या आश्चर्यकारक आहेत. यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे ड्रग अँगल. अभिनेता सुशांत प्रकरणाचा तपास सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर येऊन पोहचला आहे. या प्रकरणात जेथे सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे नाव प्रथम समोर आले आणि तिला अटक करण्यात आली. त्याचबरोबर यामध्ये आणखी बरीच नावे सामील होताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नावही समोर येत आहे, जे आश्चर्यकारक आहे. त्याचबरोबर ट्विटरवर यावेळी दीपिका पादुकोणवर बहिष्कार घालण्याबरोबरच तिच्याशी संबंधित अनेक माइम्सही व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड ड्रग्स चॅटमध्ये उल्लेखित मोठ्या नावांमध्ये दीपिका पादुकोणचेही नाव आहे. खरं तर, नुकतेच काही अहवाल समोर आले आहेत, ज्यात असे म्हटले आहे की दीपिका पादुकोणचेही ड्रग प्रकरणात नाव असून एनसीबीच्या चौकशीत तिचा समावेश होऊ शकतो.

त्याचवेळी, दीपिका पादुकोण बद्दल ही बातमी समोर येताच ट्विटरवर विविध प्रकारचे माइम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

फोटो शेअर करताना एकाने लिहिले की, “रिया तुरूंगात दीपिकाची वाट पहात आहे.”

बॉलिवूड स्टार्सच्या पार्टीजवर निशाणा साधत एका युजरने लिहिले की, ‘पार्टीच्या आधी आणि नंतर …’

एका युजरने रणवीर सिंगचा हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘दीपिका पादुकोणच्या मते रणवीर सिंग सामान्य आहे आणि सुशांत डिप्रेशनमध्ये होता?

काहींनी तर युट्यूबवर दीपिकाला डिस्लाइक करण्याची तयारी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like