इंस्टावरून सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर ‘हॉट’ अ‍ॅक्ट्रेस ईशा गुप्तानं शेअर केला प्रचंड ‘बोल्ड’ फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ईशा गुप्ता बॉलिवूडमधील बोल्ड अॅक्ट्रेसपैकी एक मानली जाते. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. ती नेहमीच आपले फोटो सोशलवर शेअर करत असते. अलीकडेच तिनं तिच्या इंस्टावरून सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले होते. यानंतर आता तिनं एक अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती सध्या सोशलवर चर्चेत आली आहे.

ईशानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ईशा प्रचंड हॉट दिसत आहे. ईशाच्या या फोटोनं सोशलवर राडा घातला आहे. ईशाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरची बिकिनी घातली आहे आणि त्यावर डेनिम जॅकेट घातलं आहे. खास बात अशी की, तिनं याची चैन खुलीच ठेवली आहे.

चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड लुक खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. चाहत्यांनी कमेंटचा तर नुसता पाऊसच पाडला आहे.

ईशाविषयी थोडक्यात…

ईशा गुप्ताला सोशलवर फोटो शेअर करायला खूप आवडतं. ईशा गुप्ता ही एक भारतीय सिने अभिनेत्री आहे. ईशा 2007 ची मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेता आहे. यानंतरच ईशानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. जन्नत 2 या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. ईशाचे इंस्टावर 5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.