सर्जरी नंतर रणदीप हुडाची लवकरच वापसी, इन्स्टाग्रामवर शेअर केला वर्कआऊटचा Video

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड कलाकार रणदीप हुडा आपल्या सुपर ऍक्टिंग मुळे नेहमी आपल्या चाहत्यांचे मनावर राज करतात. काही दिवसांपूर्वी रणदीप हुडा यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यासाठी ते मुंबई मधील ब्रीच कँडी या हॉस्पिटलमध्ये होते. त्यामध्ये त्याच्या पायाची सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे त्याचे चाहते खूप हैराण झाले होते. परंतु रणदीप हुडा यांनी इन्स्टाग्रामवर वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

https://www.instagram.com/randeephooda/?utm_source=ig_embed

या व्हिडिओ मध्ये रणदीप हुडा हा वर्क आऊट करत आहे आणि त्याच्या उजव्या पायाला प्लास्टर देखील या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ तीन लाख वेळेस पहिला गेला आहे. ज्यामध्ये तो वर्कआऊट करत आहे व त्याच्या सोबत ट्रेनर देखील दिसत आहे जो त्याला मदत करत आहे. ‘पुन्हा स्वतःच्या पायावर’ अशा प्रकारचे कॅप्शन देखील रणदीप ने या व्हिडिओ ला दिले आहे. रणदीप हुडा हा लवकरच ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सलमान खान हा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like