‘मलंग’नंतर आता ‘या’ वेब सीरिजमध्ये दिसणार एली अवराम ! रोलबद्दल बोलताना म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार एली अवराम शेवटची मलंग या सिनेमात खूपच वेगळ्या अंदाजात दिसली होती. अदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी आणि अनिल कपूर स्टारर या सिनेमात एलीच्या बदललेल्या लुकमध्ये तिची हेअर स्टाईलच नाही तर टॅटूही दिसले होते. तिच्या कामाचंही खूप कौतुक झालं होतं. एलीनं काही दिवसांपूर्वी मलंग लुकवालेच काही थ्रोबॅक फोटो सोशलवर शेअर केले होते ज्यामुळं ती चर्चेत आली होती. यानंतर आता एली आगामी प्रोजेक्टला घेऊन चर्चेत आली आहे. मलंगमधून लोकप्रियता मिळवल्यानंतर आता ती लवकरच 7 सेंस वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे इतरही काही प्रोजेक्ट्स आहे. एलीनं यावर भाष्य केलं आहे.

एली म्हणते, “मलंग सिनेमानंतर माझं खूपच कौतुक झालं. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर मला अशाही लोकांकडून प्रेम मिळालं ज्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नव्हता.”

एली पुढे म्हणाली, “निश्चितपणे हा माझा मोठा सन्मान आहे. मला काही शानदार सिनेमांची ऑफर येत आहे. आधी अंस अजिबात नव्हतं. मी खूप उत्साहित आहे. कारण लोक आता माझ्या कामाला आणि प्रतिभेला ओळखत आहेत. वास्तविक याचाच मला खूप आनंद होत आहे.”

https://www.instagram.com/p/CAXJ1f-gKb9/

एली आता गौरांग दोषीच्या आगामी वेब सीरिज 7 सेंस मध्ये दिसणार आहे. यावर बोलताना ती म्हणाली, “7 सेंसमधील माझ्या भूमिकेबद्दल मी सुपरएक्साईटेड आहे. प्रेक्षक आता पुन्हा एकदा मला वेगळ्या भूमिकेत पाहतील. कारण ही एक मर्डर मिस्ट्री आहे. याशिवाय मी याबद्दल जास्त काही सांगू शकत नाही. याच महिन्यात याची शुटींग सुरू होत आहे. आर माधवन, प्रतिक बब्बर आणि इतर काही बडे कलाकार यात दिसणार आहेत.”

https://www.instagram.com/p/B9Izu2GgZJq/

एलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती 7 सेंस या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी 2 सिनेमे आहेत. इतकंच नाही तर एक महिला केंद्रीत सिनेमासाठी तिची बातमचित देखील सुरू आहे. 2013 आलेल्या मिकी वायरस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय एली किस किस से प्यार करूं, नाम शबाना, बाजार, जबाडिया जोडी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. एलीनं सिनेमा आणि अल्बमच्याआधी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत तिनं पहिली अॅड केली आहे. एली बिग बॉसमध्येही दिसली आहे. लासट टाईम एली मलंग सिनेमात दिसली. 7 फेब्रुवारी रोजी 2020 हा सिनेमा रिलीज झाला होता.

https://www.instagram.com/p/B8DW86lgmWa/

https://www.instagram.com/p/B8Bjg7XgFVA/

https://www.instagram.com/p/B8Erk-GgF_m/

https://www.instagram.com/p/B7qMO9GginL/

https://www.instagram.com/p/B7cuCbigMtT/

https://www.instagram.com/p/B7aucWRgh89/

https://www.instagram.com/p/B7NLxHTAKtV/