‘आश्रम’नंतर आता साऊथ सिनेमात धमाका करणार बॉबी देओल ! ‘बाहुबली’ सारखा असू शकतो सिनेमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा मुलगा बॉलिवूड स्टार बॉबी देओल (Bobby Deol) याच्या बॉलिवूडमधील अभिनयच्या यशाचा ग्राफ काही खास नव्हता. लॉकडाऊन दरम्यान त्यानं ओटीटीवर आणि वेब सीरिजमध्ये खूप काम केलं. आश्रम (Aashram) या वेब सीरिजची खूप चर्चा झाली. यातील बॉबीच्या अभिनयाचंही खूप कौतुक होताना दिसलं. एम एक्स प्लेअरवर ही सीरिज रिलीज झाली होती.

बॉलिवूडमध्ये निराश झालेल्या बॉबीला आश्रमच्या यशानंतर एक आशेचा किरण दिसला. आता त्याला अनेक बिग बॅनर सिनेमांच्या ऑफर येतााना दिसत आहेत. आता तर साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीचीही नजर त्याच्यावर पडली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, साऊथ इंडियाच्या ग्रँड सिनेमात लवकर बॉबी देओल दिसू शकतो. असं समजत आहे की, बाहुबली टक्कर देण्यासाठी बनणाऱ्या एका सिनेमात बॉबीला व्हिलनचा रोल साकारण्याची संधी मिळत आहे. आता बॉबीचं करिअर वेग घेताना दिसत आहे.

बॉबीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो आश्रम (Aashram) या वेब सीरिजच्या दोन्ही सीजनमध्ये दिसला आहे. याचा पहिला सीजन प्रचंड गाजला होता. यानंतर याचा दुसरा सीजन आश्रम चॅप्टर 2 – द डार्क साईड (Aashram Chapter 2 – The Dark Side) 11 नोव्हेंबर 2020 रोजी (वार बुधवार) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. डायरेक्टर प्रकाश झा (Prakash Jha) यांनी डायरेक्ट केलेली ही सीरिज एम एक्स प्लेअर (MX Player) वर रिलीज झाली होती.