सनी लिओनीनंतर आता गायिका नेहा कक्करही बनली ’कॉलेज टॉपर’, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगाल राज्याच्या तीन महाविद्यालयाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये टॉपवर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिचे नाव पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता पुन्हा एकदा असाच घोळ समोर आला आहे. सनी लिओनीनंतर एका महाविद्यालयाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या मेरिट लिस्टमध्ये बॉलिवूड सिंगर नेहा कक्करचे नाव टॉपर म्हणून झळकले आहे. संबंधित महाविद्यालय प्रशासनाला हि चूक उशीरा कळाली, त्यानंतर त्यांनी चूक सुधारून नवीन यादी प्रसिध्द केली आहे.

पश्चिम बंगाल राज्याच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक महाविद्यालयाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या मेरिट लिस्टमध्ये हा घोळ आढळून आला आहे. माणिकचक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध केली आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण लिस्टमध्ये टॉपवर गायिका नेहा कक्करचे नाव होते. तिचे नाव पाहून चर्चा सुरु झाली अन् कालांतराने कॉलेज प्रशासनाला जाग आली.

कॉलेज प्रशासनाने तातडीने ही चूक दुरूस्त केली आणि नवीन यादी जाहीर केली. यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केलीय, असे माणिकचक कॉलेज प्राचार्य अनिरुद्ध चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. काही खोडकर वृत्तीच्या लोकांनी केले असून हे कृत्य निंदनीय आहे. मेरिट लिस्टमध्ये अशाप्रकारची नावं टाकून उच्च शिक्षण प्रणाली किंवा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बदनाम केले जात आहे, असे अनिरूद्ध चक्रवर्ती यांनी म्हंटले आहे.

याअगोदरही याद्यांतही मिया खलिफा, सनी लिओनी, डेनी डेनियल्सचे नाव
मागील काही दिवसांपूर्वी सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये अभिनेत्री सनी लिओनीचे नाव आले होते. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील बारासात शासकीय महाविद्यालयाच्या शनिवारी जारी झालेल्या इंग्रजी ऑनर्सच्या यादीत तिस-या स्थानावर सनी लिओनी हिचे नाव आले होते. याच जिल्ह्यातील बज बज कॉलेजच्या बीए अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश यादीमध्येही अभिनेत्री सनी लिओनीचे नाव आले होते.

एवढंच नव्हे तर, कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजच्या इंग्रजी ऑनर्सच्या प्रवेश प्रक्रिया यादीच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लिओनी हिचे नाव टॉपला होते. त्यापूर्वी अशाच यादींत अमेरिकन पॉर्न स्टार डेनी डेनियल्स आणि लेबनॉनची वेबकॅम मॉडेल मिया खलिफा हिचे नावही आले होते.