Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

सैफ अली खान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांवड (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी (वार शुक्रवार) रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडियावर याला विरोध होताना दिसत आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. यावरून आताा वाद सुरू झाला आहे जो काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी अलीकडेच तांडव वेब सीरिजवर आक्षेप घेतला होता. त्यांनी सैफ विरोधातही कठोर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, सैफ अली खान एका वेब सीरिजचा हिस्सा आहे जी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावते. आता तांडववरून सुरू असणारा वाद पाहता सैफ अली खान आणि करीना कपूर यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सैफ-करीनाच्या घराच्या बाहेर म्हणजेच फॉर्च्युन हाईट्सच्या बाहेर सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.

शनिवारी सोशल मीडियावर #BanTandavNow हा हॅशटॅग दुसऱ्या नंबरवर ट्रेंड होताना दिसला. दुपारी साडे तीनच्या दरम्यान जवळपास 1.65 लाख ट्विट करण्यात आले आहेत. असा दावा केला जात आहे की, सीरिजमध्ये भगवान शंकराचा अपमान केला आहे आणि राष्ट्रविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देखील दिलं आहे.