ऐश्वर्या रायच्या ‘डुल्पीकेट’चा सोशलवर ‘राडा’ ! लुक पाहून चाहते ‘अवाक्’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चन आज लाखोंच्या मनावर राज्य करते. अनेक फॅन्स तिला कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या तिच्या एका डुप्लीकेटची सोशलवर खूप चर्चा सुरू आहे. ही डुप्लीकेट ऐश्वर्याच्या एका सुरपहिट साऊथ सिनेमातील सीन रिक्रिएट करताना दिसत आहे. सध्या तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लीकेटला आणि तिच्या अ‍ॅक्टींगला पाहून प्रत्येकजण चकित झाला आहे. अनेकांनी तिला ऐशची डुप्लीकेट संबोधलं आहे तर काही लोक असेही आहेत ज्यांनी तिला दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या राय यांचं कॉम्बिनेशन म्हटलं आहे. तिची अ‍ॅक्टींग पाहून तर अनेकांनी असंही म्हटलं की, तिनं अभिनयात हात आजमवायला हवा.

ऐश्वर्याच्या या डुप्लीकेटचं नाव Ammuzz Amrutha असल्याचं सांगितलं जात आहे. तिचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात साऊथमधील डायलॉग्सवर अॅक्टींग करताना दिसत आहे. तिनं लुकदेखील ऐश्वर्या सारखाच केला आहे. अनेकजण तिला कमेंट करत ऐश्वर्या रायची कॉपी म्हणत आहे.

https://www.instagram.com/p/CAnO_V5HP_L/?utm_source=ig_embed

याआधीही मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिला ऐश्वर्याची कॉपी म्हटलं जात होतं. एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात तिनं सेम ऐशसारखचा लुक केला होता.

https://www.instagram.com/p/B_xMKcen4JI/?utm_source=ig_embed