अभिषेक बच्चननं विवेक ओबेरॉयची गळा भेट घेतली, लोक पहातच राहिले (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वादविवादाबद्दल सर्वांना माहिती आहे. एक काळ असा होता की विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय संबंधात होते. तथापि नंतर हे संबंध तुटले. आता ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत विवाहित जीवन जगत आहे. अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांनी नेहमीच एकमेकांसमोर येण्याचे टाळले आहे.

नुकतीच वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट पी.व्ही. सिंधू हिचा सन्मान सोहळा पार पडला. जिथे बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार दिसले. अभिषेक बच्चन वडील अमिताभ बच्चनसमवेत या कार्यक्रमात दाखल झाला. विवेक ओबरॉय आपल्या परिवारासह तेथे पोहोचला.

यावेळी विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय देखील उपस्थित होते. तिथे दोन्ही कुटुंबांची भेट झाली. जिथे अभिषेक-विवेक हसत हसत आपापसात बोलले आणि एकमेकांना मिठी मारली.

विवेक ओबेरॉय नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये दिसला होता तर विवेकचा पुढचा चित्रपट कन्नडमध्ये असल्याची बातमी आहे. अभिषेक बच्चन मनमर्जियात दिसला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like