Big B अमिताभला पहिल्यांदा डायरेक्ट करणार अजय देवगण ! ‘या’ सिनेमात करणार एकत्र काम !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) यांच्या चाहत्यांसाठी आता खुशखबर आहे. दोन्ही सुपरस्टार आता पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. याआधीही त्यांनी एकत्र काम केलं आहे. मेजर साहब, खाकी आणि सत्याग्रह अशा काही सिनेमांची नावं सांगता येतील ज्यात त्यांनी एकत्र काम केलं आहे. सत्याग्रह या सिनेमात ते शेवटचे एकत्र दिसले आहेत.

अवघ्या 7 वर्षांनंतर अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांची जोडी मेडे (Mayday) या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. बॉलिवूड ट्रेड ॲनलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यानं सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. मेडे सिनेमाची शुटींग डिसेंबरमध्ये हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. अजय या सिनेमात पायलटची भूमिका साकारणार आहे. बिग बींच्या रोलबद्दलची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

मेडे सिनेमात अजय अभिनय तर करतच आहे. सोबतच त्यानं हा सिनेमा डायरेक्ट आणि प्रोड्युस देखील केला आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.