home page top 1

अजय देवगणने खरेदी केली देशातील सर्वात महागडी SUV कार , किंमत जाणून ‘व्हाल’ थक्क !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिनेमात गाड्यांसोबत अ‍ॅक्शन सीन करणारा अभिनेता अजय देवगण खऱ्या आयुष्यातही गाड्यांचा खूप शौकीन आहे. त्याच्याकडे अनेक गाड्या आहेत. त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये आता आणखी एक एसयुव्ही समाविष्ट झाली आहे. ज्याची किंमत लाखात नाही तर कोटीत आहे. त्याची किंमत ऐकली तर तुम्हीही चकित व्हाल.

एका रिपोर्टनुसार, अजय देवगणने भारतातील सर्वात महाग एसयुव्ही कारपैकी एक कार खरेदी केली आहे. Rolls Royce Cullinan असं या एसयुव्ही कारचं नाव आहे. खरेदी करणाऱ्याच्या हिशोबाने Rolls Royce डिझाईन करून देतं. काही दिवसांपूर्वीच अजयने या कारचे बुकिंग केल्याचे समजत आहे. एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

ही कार घेण्यासाठी तुम्हाला 6.95 कोटी खर्च करावे लागतात. ही कार देशात काही लोकांकडेच आहे. यात उद्योगपती मुकेश अंबानी, भूषण कुमार यांचा समावेश आहे. या कारची एक्स शोरूम प्राईज जवळपास 7 कोटी रुपये आहे. ऑनरोड किंमत अजून वाढू शकते. त्यात 10-15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

अजय देवगणने महागडी गाडी घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने अशा लग्जरी गाड्या खरेदी केल्या आहेत. त्याच्याकडे आधीच Land Rover Range Rover, MINI Cooper, BMW Z4 अशा गाड्या आहेत.

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच तो मैदान सिनेमात दिसणार आहे. यात त्याने भारतीय फुटबॉल टीमचे कोच राहिलेले सैय्यद अब्दुल रहीम यांचा रोल साकारला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like