‘या’ दिवशी रिलीज होणार अजय देवगणचा ‘मैदान’ !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgan) चा मैदान (Maidaan) हा सिनेमा दीर्घकाळापासून चर्चेत आहे. चाहत्यांना या स्पोर्ट ड्रामा सिनेमाची आतुरता आहे. अशात आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. खुद्द अजयनं सोशलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. चाहत्यांना या सिनेमासाठी जवळपास एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये फेस्टीवल सीजनला रिलीज होणार आहे.

अजयनं ट्विट करत मैदान सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे. 15 ऑक्टोबर 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. म्हणजेच तब्बल अकरा महिन्यानंतर हा सिनेमा रिलीज होणार आहे. मोठ्या स्केलवर हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा 4 भाषांमध्ये रिलीज होईल.

अजयचा मैदान हा सिनेमा आधी याच वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं इतर सिनेमांप्रमाणेच सिनेमाची शुटींग आणि रिलीज डेटवर ब्रेक लागला होता. या सिनेमात अजय देवगण प्रियामणि, गजराव राव, आणि बोमन इराणी प्रमुख भूमिकेत आहेत.

भारतीय फुटबॉल टीमचे कोच सईद अब्दुल रहिम यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. मैदान हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. सईद अब्दुल रहिम 1950 ते 1963 पर्यंत फुटबॉल टीमचे कोच होते. अजय देवगण रहिम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांना मॉडर्न इंडियन फुटबॉलचा आर्कीटेक्टही म्हटलं जातं. बधाई हो हा सिनेमा डायरेक्ट करणारे अमित शर्मा (Amit Sharma) हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. त्यांचा हा बॉलिवूडमधील दुसरा सिनेमा आहे.

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो मैदान सिनेमात दिसणार आहे. यात त्यानं भारतीय फुटबॉल टीमचे कोच राहिलेले सैय्यद अब्दुल रहीम यांचा रोल साकारला आहे. याशिवाय तो भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही दिसणार आहे. अभिषेक दुधैयानं याचं डायरेक्शन केलं आहे. याशिवाय आता त्याच्याकडे एस एस राजामौली यांचा RRR हा सिनेमा देखील आहे.