अभिनेता अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! तुम्हीही म्हणाल – ‘Thank God’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या जिकडे तिकडे कोरोनाचा विषय सुरू आहे. सामान्यांसोबतच बॉलिवूड कलाकारही सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. असं सगळं असताना आता बॉलिवूड स्टार अजय देवगणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तसं तर अजय अँग्री यंग मॅन म्हणून ओळखला जातो. आता मात्र त्यांनी चाहत्यांचा हसवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी अजयनं डायरेक्टर इंद्र कुमारच्या एका मस्टीस्टारर कॉमेडी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाचं नाव आहे टोटल धमाल. सिनेमानं चांगली कमाई केली होती. आता पुन्हा एका इंद्र आणि अजय यांनी हात मिळवला आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, अजय देवगण आणि इंद्र कुमार यांनी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. थँक गॉड असं या सिनेमाचं नाव आहे.

रिपोर्टनुसार अजयच्या या आगामी सिनेमात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि सद्धार्थ मल्होत्रा हे कलाकारही दिसणार आहेत. अनेक कॉमेडी किंग असलेले अभिनेतेदेखील या सिनेमात झळकणार आहेत. अनेक वर्षांपासून या सिनेमावर काम सुरू आहे. सिनेमाची शुटींग 10 एप्रिल 2020 पासून सुरू होणार होती. परंतु कोरोनामुळं शुटींग टाळण्यात आल आहे. सिनेमा 2021 च्या सुरूवातीला रिलीज केला जाणार आहे.