यूपीचे CM योगी आदित्यनाथ आणि ‘खिलाडी’ अक्षय यांच्यात नोएडाच्या फिल्म सिटीबद्दल नव्हे, तर ‘या’वर झाली होती चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याची भेट घेतली. एका सरकारी प्रवक्त्यानं याबाबत माहिती दिली होती. असं सांगितलं जात होतं की, यूपीमध्ये होणाऱ्या फिल्म सिटीबद्दल ही भेट झाली होती.

राम सेतूच्या शूटिंगबद्दल झाली होती बैठक

अक्षय आणि योगी आदित्यनाथ यांची भेट झाल्याचं समोर आल्यानंतर असे अंदाज लावले जात होते की, दोघांच्या मीटिंगचा हेतू हा उत्तर प्रदेशात होणारी फिल्म सिटी आहे. याबद्दल सोशल मीडियावरही खूप चर्चा झाली होती. परंतु आता अशी माहिती समोर आली आहे की, योगी आणि अक्षय यांची ही मीटिंग अक्षयचा आगामी सिनेमा राम सेतूबद्दल झाली होती. 90 मिनिटांच्या या मीटिंगमध्ये यूपीमधील फिल्म सिटीवर कोणतीही चर्चा झाली नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे.

योगींना भेटू इच्छित होता अक्षय कुमार

असं सांगितलं जात आहे की, अक्षय कुमार यानंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची मागणी केली होती. योगी लखनऊ म्युनिसिपल कार्पोरेशन बॉन्डला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करण्यासाठी मंबई दौऱ्यावर होते. राम सेतूची शूटिंग अयोध्येत करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी अक्षयनं योगींची भेट घेतली होती. सूत्रांनी सांगितलं की, योगी आदित्यनाथ अक्षयकडून सादर केलेला प्रस्ताव पाहून खूश होते. अक्षयला प्रत्येक प्रकराचं सहकार्य करण्याचा विश्वास योगींनी यावेळी दिला.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. नुकताच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे. आता त्याच्याकडे राम सेतू हाही सिनेमा आहे.