‘खिलाडी’ अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ डिजिटली रिलीज होणार, 1 अब्जहून अधिक किंमतीला विकले गेले राईट्स !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा ईद 2020 च्या निमित्तानं रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं ते काही शक्य झालं नाही. आता हा सिनेमा डिजिटली रिलीज होणार आहे. कियारा आडवाणी आणि अक्षय कुमार स्टारर हा सिनेमा आता हॉट स्टावर रिलीज होणार आहे अशी माहिती आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, हा लक्षमी बॉम्ब हा सिनेमा डिजिटली रिलीज करण्यासाठी भरमसाठ रक्कम घेण्यात आली आहे. एका ट्रेड अॅनलिस्टनं या बातमीची पुष्टी करत म्हटलं आहे की, हे खरं आहे की, हा सिनेमा आता हॉट स्टारवर रिलीज केला जाणर आहे.

ट्रेड अॅनलिस्टनं असंही सांगितलं की, साधारणपणे एक मोठ्या सिनेमाचे डिजिटल राईट्स जास्तीत जास्त 60-70 कोटी रुपयांच्या रेकॉर्ड किंमतीवर विकले जातात. परंतु हा सिनेमा रिलीज न होतो थेट डिजिटलवर येणार आहे तर त्यांनी यासाठी मोठी रक्कम घेतली आहे.

लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा 125 कोटींना विकण्यात आला आहे. डिजिटल रेट पाहता ही किंमत खूप मोठी आहे. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई करू शकणारा सिनेमा आहे हेही आपण लक्षात घ्यायला हवं असंही त्यांनी सांगितलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like