समोर आली ‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ अन् रणवीरच्या 83 सिनेमाची नवीन रिलीज डेट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अक्षय कुमार ( (Akshay Kumar) याचा सूर्यवंशी (Sooryavanshi) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा 83 (83) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं दोन्ही सिनेमांची रिलीज डेट टाळली गेली होती. आधी असा अंदाज लावला जात होता की, हे सिनेमे या वर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज केले जातील. परंतु आता पुन्हा एकदा या सिनेमांची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. यावरून असं समजत आहे की, आता अक्षय कुमार 2021 मध्ये धमाका करणार आहे. परंतु सिनेमाच्या मेकर्सकडून अद्याप कोणत्याही एका तारखेची याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

बॉलिवूडमधील ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यानं ट्विट करत सांगितलं आहे की, सर्वांच्या नजरा या 2021 च्या पहिल्या क्वार्टरवर आहे. (#Sooryavanshi) आणि (#83TheFilm) सिनेमा हॉलमध्ये रिलीज होणार आहेत. पुढील वर्षी (2021)… दोन्ही सिनेमे हे 31 मार्च 2021 पूर्वीच रिलीज केले जाणार आहेत. परंतु रिलीज डेट मात्र अद्याप फायनल झालेली नाही असंही तरण आदर्शन यानं आपल्या ट्विटमधून सांगितलं आहे. सिनेमा पुढील वर्षी रिलीज होत आहे हे नक्की आहे. परंतु तारीख मात्र अद्याप ठरलेली नाही. चाहत्यांना आता तारखेबद्दल उत्सुकता आहे.

तरण आदर्शचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि रणवीर सिंगचे चाहते मात्र सिनेमाच्या रिलीजबद्दल आनंदित झाले आहेत. अनेकांनी सिनेमाच्या रिलीजबद्दल कळताच त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. नुकताच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो 83 या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. सिनेमात रणवीरनं लिजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता; परंतु लॉकडाउनमुळं सिनेमाची रिलीज टाळण्यात आली.