‘लॉकडाऊन’ मध्ये ‘खिलाडी’ अक्षयचं सर्वात मोठं नुकसान, ‘सूर्यवंशी’सह लटकले ‘हे’ 7 सिनेमे ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या लॉकडाऊनमध्ये सारं काही ठप्प आहे. अशात फिल्म इंडस्ट्रीलाही मोठा झटका बसला. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारंच इतर स्टार्सच्या तुलनेत जास्त नुकसान झालं आहे. एका एका रिपोर्टनुसार अक्षये एक किंवा दोन नाही तर तब्बल 7 सिनेमे अडकले आहेत. हे सिनेमे कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

1)   सूर्यवंशी- रोहित शेट्टी डायरेक्टेड हा सिनेमा मार्च महिन्यात रिलीज केला जाणार होता. लॉकडाऊनमुळं याची रिलीज टाळण्यात आली होती.

2)   लक्ष्मी बॉम्ब- या सिनेमात अक्षय साडी, बांगड्या, कपाळावर टिकली अशा अवतारात दिसणार आहे जो याआधी कधीच दिसला नाही.

3)   बेल बॉटम- अक्षयचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. 2020 च्या अखेरपर्यंत हा सिनेमा रिलीज केला जाणार होता. परंतु याचाही काही अतापता नाही.

4)   पृथ्वीराज- या सिनेमा मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आणि अक्षय पहिल्यांदाच एकत्र दिसणार होते. हा सिनेमा दिवाळीत रिलीज होणार होता. परंतु अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.

5)   अतरंगी रे- हा एक मोठा सिनेमा आहे ज्यात अक्षयसोबत सारा अली खान आणि साऊथ सुपरस्टार धनुष दिसणार होता. लॉकडाऊनमुळं सिनेमाची शुटींग बंद करण्यात आली.

6)   बच्चन पांडे- या सिनेमात अक्षय रफ लुकमध्ये दिसणार होता. सिनेमाचं पोस्टर पाहून सारेच अवाक् झाले होते. हा सिनेमा ख्रिसमसला रिलीज होणार होता. परंतु याची काहीच खबर नाही.

7)   या सिनेमांव्यतिरीक्त अक्षय एकता कपूरच्या एका अॅक्शन कॉमेडी सिनेमात काम करताना दिसणार होता. एका साऊथ सिनेमाचा हा रिमेक होता. परंतु लॉकडाऊनमुळं याचं काही सुरू होऊ शकलं नाही.