Video : ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’चा टीजर रिलीज, व्हिडीओमध्येच ‘सरप्राइज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – या वर्षी १५ ऑगस्टच्या निमित्ताने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार ‘मिशन मंगल’ चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाचे मेकर्स जगन शक्ति यांचा हा चित्रपट त्या हिरोची कथा घेऊन येणार आहे ज्यांनी पडद्याच्या मागे राहून हे मिशन यशस्वी केले. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित केला गेला आहे. या टीजरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे.

४५ सेकेंदच्या या टीजरमध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कृति कुलहरि आणि नित्या मेनन मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच शरमन जोशी पण दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन (इसरो) च्या एका सिनिअर साइंटिस्टची भूमिका साकारणार आहे.

२०१३ मध्ये सतीश धवन स्पेस सेंटरकडून PSLV C25 रॉकेट लॉंच केले गेले होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे म्हणले तर हे खूपच क्रुशियल आहे कारण या तारखेला जॉन अब्राहमचा ‘बाटला हाउस’ आणि प्रभास आणि श्रद्धा कपूर की ‘साहो’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

एकाच तारखेला ३ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामुळे चित्रपट मेकर्सची खूपच अवघड सिच्यूएशन होणार आहे. प्रेक्षकांनाही कोणता चित्रपट पाहावा असा गोंधळ होणार आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफीसवर होताना दिसणार आहे. तिन्ही चित्रपट असे आहे ज्याची लोक अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. अशामध्ये कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल ते आपण १५ ऑगस्टलाच पाहू.

पावसाळ्यात घ्या या ‘५’ पद्धतीने ओठांची काळजी

अधिक प्रमाणात तुपाचे सेवन शरीरासाठी हानिकारक ; जाणून घ्या ‘योग्य मात्रा’

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान