‘खिलाडी’ अक्षय कुमारनं मुलीसाठी केलं असं काही, जाणून व्हाल थक्‍क

पोलीसनामा  ऑनलाइन टीम : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार परफेक्ट फॅमिलीमॅन आणि प्रोफेशनल आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामात संतुलन कसं राखायंच हे अक्षय कुमारला चांगलंच ठाऊक आहे. मुलगी निताराला घेऊन अक्षय खूप संवेदनशिल आहे. तुम्हाला माहिती आहे का की, अक्षयचा आगामी सिनेमा मिशन मंगल हा केवळ त्याने आपल्या मुलीसाठी केला आहे. खुद्द अक्षयने याबाबत खुलासा केला आहे.

अक्षयने सोशलवर एक नोट शेअर केली आहे. या नोटचं शीर्षक आहे मिशन इंस्पायर. या नोटमध्ये अक्षयने लिहिलं आहे की, “मला नेहमीच असा सिनेमा करण्याची इच्छा होती जो येणाऱ्या पिढीला प्रेरीत करेल. जो सिनेमा त्यांच्या कल्पना आणि जज्ञासांना भरारी घेण्यास मदत करेल. मिशन मंगल हा माझ्यासाठी असाच सिनेमा आहे.” अक्षयने अशी आशा केली आहे की, हा सिनेमा जितका प्रेरीत करेल तितकंच मनोरंजनही करेल. या नोटमध्ये अक्षयने सांगितले की, मिशन मंगल, मंगळ अभियानाच्या खऱ्या घटनेवर आधारीत सिनेमा आहे. ही सामान्य लोकांच्या असामान्य ध्येयाला गवसणी घालण्याची गोष्ट आहे. हा सिनेमा सिद्ध करतो की, विचार आणि स्वप्ने आकाशासारखेच अमर्यादित आहेत.

अक्षयने ही नोट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत लिहिली आणि शेअर केली आहे. यासोबतच ट्विटमध्ये अक्षय म्हणतो की, “मिशन मंगल असा सिनेमा आहे ज्याच्याकडून मला अशी अपेक्षा आहे की, हा सिनेमा प्रेरीत करण्यासोबतच मनोरंजनही करेल. हा सिनेमा मी खास करून माझी मुलगी आणि तिच्या वयाच्या मुलांसाठी केला आहे. कारण त्यांना भारताच्या मंगळ मिशनची अद्भूत गोष्ट माहीत व्हावी.”

हा सिनेमा 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. मिशन मंगलमध्ये अक्षय सोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, कीर्ति कुल्हरी आणि शरमन जोशी मुख्य भूमिकेत असणार आहेत. जगन शक्ती यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 15 ऑगस्ट रोजी या सिनेमाचा सामना जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस आणि प्रभासच्या साहो सिनेमासोबत होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

घोरण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो आजारांचा संकेत

चेहरा ‘मुलायम’ करण्यासाठी वापरा बटाट्याचा फेसपॅक

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सिने जगत

Video : ‘या’ चित्रपटामध्ये सनी लियोनीचं एकदम ‘कडक’ आइटम सॉन्ग !

‘या’ चित्रपटामध्ये सनी लियोनीचं एकदम ‘कडक’ आइटम सॉन्ग !

5 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या अभिनेत्री स्वरा भास्करचं ब्रेकअप ?

बहुजननामा

काँग्रेसचे आमदार अमिता चव्हाणांच्या मतदार संघातच काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव

मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदे ?