नवरात्रीमध्ये माता ‘लक्ष्मी’ बनला अक्षय कुमार, शेअर केला ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ‘लूक’ !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – खिलाडी अक्षय कुमार आपल्या नवनवीन स्टंट मुळे नेहमीच चर्चेत असतो. अक्षय कुमारने केलेला भूल भुलय्या नामक हॉरर कॉमेडी असलेला सिनेमा चांगलाच प्रसिद्ध झाला होता. आता अक्षय कुमार ने नवरात्रीचा मुहूर्त साधत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ चे पोस्टर शेअर केले आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार एका महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने टाकलेल्या पोस्टरमध्ये अक्षय महिलेच्या वेशात एका दुर्गामातेच्या प्रतिमेसोबत उभा आहे. त्यासोबत अक्षयने लिहिले आहे, नवरात्रीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या आतील शक्ती आणि आपल्या अपार क्षमतेचा उत्सव करणे आहे. या मुहूर्तावर लक्ष्मीसारखा माझा लूक शेअर करत आहे. हे असे पात्र आहे ज्यासाठी मी उत्साहित सुद्धा आहे आणि नर्वस सुद्धा . . मात्र आयुष्य तेथेच सुरु होते जिथे तुमचे आरामदायक आयुष्य संपून जाते. हो ना ?

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कियारा आडवाणी झळकणार आहे. पुढील वर्षी पाच जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर सुप्रसिद्ध कंचना चित्रपटांचे दिग्दर्शक राघव लॉरेंस हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत. हा चित्रपट साऊथच्या कंचना चित्रपटाचा रिमेक असणार आहे.

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या