‘खिलाडी’ अक्षयच्या ‘मिशन मंगल’ला मराठीत प्रदर्शित होऊ देणार नाही’ : मनसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा मिशन मंगल 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात रिलीज होणार आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फिल्म डिव्हीजनचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अशी घोषणा केली आहे की, जर अक्षयचा मिशन मंगल सिनेमा मराठीत डब करून रिलीज केला ते या व्हर्जनला रिलीज होऊ देणार नाही.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अमेय खोपकर म्हणाले की, “मला अक्षयचे सिनेमे आवडतात. मी त्याचा मोठा फॅन आहे. त्याचे अनेक सिनेमे मी पाहिले आहेत. जर हा सिनेमा हिंदीत रिलीज केला जात असेल तर मला सिनेमाच्या निर्मात्यांपासूनही कसली अडचण नाही. परंतु हा सिनेमा मराठीत डब करून मराठीत रिलीज होत असेल तर आम्ही असं होऊ देणार नाही.”

अमेय खोपकर पुढे म्हणाले की, “प्रत्येक थिएटरमध्ये एक थिएटर मराठी सिनेमासाठी आरक्षित ठेवलं जातं. जर ते मिशन मंगलला मराठीत डब करून रिलीज करत असतील तर आम्ही असं होऊ देणार नाही. मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी यात हस्तक्षेप करावा.”

मिशन मंगल हा सिनेमा भारताच्या गौरवगाथेचं प्रदर्शन करतो. हा सिनेमा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनायजेशन(ISRO)च्या कामगिरीवर भाष्य करत आहे. जगन शक्ती यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा खऱ्या जीवनातील वैज्ञानिकांपासून प्रेरीत होऊन तयार करण्यात आला आहे ज्यांनी यशस्वीरीत्या मंगळावर मंगळयान पाठवलं होतं.

या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरीक्त तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन आणि कृती कुलहरी प्रमुख भूमिकेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त