‘खिलाडी’ अक्षयला मिळाली परवानगी ! ‘अयोध्ये’तील रिअल लोकेशन्सवर शूट होणार ‘राम सेतू’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच त्याचा आगामी सिनेमा राम सेतू (Ram Setu) मध्ये काम करताना दिसणार आहे. अलीकडेच त्यानं सिनेमाचं पोस्ट शेअर केलं होतं. यानंतर सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) भेटही घेतली आहे. राम सेतू सिनेमाबद्दल चर्चा करण्यासाठीच त्यानं ही भेट घेतली होती.

राम सेतूच्या शूटिंगबद्दल झाली होती बैठक
अक्षय आणि योगी आदित्यनाथ यांची भेट झाल्याचं समोर आल्यानंतर असे अंदाज लावले जात होते की, दोघांच्या मीटिंगचा हेतू हा उत्तर प्रदेशात होणारी फिल्म सिटी आहे. याबद्दल सोशल मीडियावरही खूप चर्चा झाली होती. परंतु आता अशी माहिती समोर आली आहे की, योगी आणि अक्षय यांची ही मीटिंग अक्षयचा आगामी सिनेमा राम सेतूबद्दल झाली होती. 90 मिनिटांच्या या मीटिंगमध्ये यूपीमधील फिल्म सिटीवर कोणतीही चर्चा झाली नाही, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

अक्षयच्या प्रस्तावानंतर खूश झाले यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ
असं सांगितलं जात आहे की, अक्षय कुमार यानंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची मागणी केली होती. योगी लखनऊ म्युनिसिपल काॅर्पोरेशन बॉन्डला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करण्यासाठी मंबई दौऱ्यावर होते. राम सेतूची शूटिंग अयोध्येत करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी अक्षयनं योगींची भेट घेतली होती. सूत्रांनी सांगितलं की, योगी आदित्यनाथ अक्षयकडून सादर केलेला प्रस्ताव पाहून खूश होते. अक्षयला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करण्याचा विश्वास योगींनी यावेळी दिला.

अयोध्येतील रिअल लोकेशन्सवर करणार शूटिंग
आता अशी माहिती समोर येत आहे की, अक्षय कुमार सिनेमाची शूटिंग अयोध्येतील रिअल लोकेशन्सवर करणार आहे. अक्षयला अयोध्येत राम सेतूची शूटिंग करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. असं सांगितलं जात आहे की, सिनेमाची शूटिंग 2021 मध्ये सुरू केली जाईल.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली होती. नुकताच तो लक्ष्मी सिनेमात दिसला आहे. यानंतर आता तो पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे, बच्चन पांडे, रक्षाबंधन अशा काही सिनेमातही काम करताना दिसणार आहे. आता त्याच्याकडे राम सेतू हाही सिनेमा आहे.