’फूल और कांटे’तून डेब्यू करणार होता अक्षय कुमार, नंतर अजय देवगनने केले होते रिप्लेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आजपासून 29 वर्षअगोदर म्हणजे 1991 मध्ये दोन दिग्गज अभिनेते अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनी बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवले होते आणि आता दोघेही आपल्या खास अभिनयाने आणि कठोर मेहनतीमुळे बॉलीवुडमध्ये राज्य करत आहेत. विशेष म्हणजे दोघांच्या डेब्यूची स्टोरी थोडी मजेशीर आहे. कारण, 29 वर्ष अगोदर म्हणजे आजच्याच दिवशी 22 नोव्हेंबररोजी रिलीज झालेला सुपरहिट चित्रपट ’फूल और कांटे’द्वारे अगोदर अक्षय कुमार बॉलीवुडमध्ये डेब्यू करणार होता, परंतु नंतर हा चित्रपट अजय देवगनला मिळाला आणि त्याने या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये एंट्री मारली.

अक्षय कुमारने ’सौगंध’मधून केला बॉलीवुडमध्ये डेब्यू
यानंतर त्याच वर्षी अक्षय कुमारने ’सौगंध’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला होता. तर, अजय देवगनचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता, परंतु अक्षयचा चित्रपट फ्लॉप झाला होता. अजय आणि अक्षय लवकरच रोहित शेट्टीचा चित्रपट ’सूर्यवंशी’मध्ये दिसणार आहेत. याच वर्षी मार्चमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केल्यानंतर अक्षयकुमारने स्वत: ’फूल और कांटे’च्या वेळी घडलेली कथा ऐकवली होती. अक्षयने म्हटले होते, आम्ही दोघांनी आपले करियर सोबत सुरू केले होते. असे सुरू केले होते की, एकाच चित्रपटासाठी दोघे लढले होते. याचा अगोदरचा चित्रपट ’फूल और कांटे’ मध्ये अगोदर मी होतो, नंतर याने मला धक्का मारला.

अजय देवगनसोबत दिसली होती मधु
22 नोव्हेंबर 1991 मध्ये रिलिज झालेल्या चित्रपट ’फूल और कांटे’ मध्ये अजयसोबत मधु फीमेल लीड रोलमध्ये होती, तर अमरीश पुरीने अजयच्या गँगस्टर वडिलांची भूमिका केली होती. अजय आणि अमरीश यांच्या भूमिकेचे समिकरणसुद्धा कथेचा महत्वाचा भाग होते. बॉक्स ऑफिसवर फूल और कांटे यशस्वी ठरली होती. हा एक रोमँटिक अ‍ॅक्शन चित्रपट होता, ज्याचे दिग्दर्शन कुकु कोहली यांनी केले होते.