आलिया भट्टची ‘कमाई’ आणि ‘गुंतवणूक’ जाणून तुमचे डोळे फिरतील, आता ‘खासगी’ विमान घेण्याचा प्लॅन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर पोहचत आहे. अनेक हिट चित्रपट देण्यासोबतच अभिनेत्री आलिया वेल्थ मॅनेजमेंटमध्ये देखील खूप पुढे आहे. अलीकडेच फोर्ब्सने टॉप -100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली असून आलिया भट्ट सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे. आलिया एका वर्षात किती पैसे कमवते ही माहिती सांगण्याआधी आलिया कसे आपले बजेट मॅनेज करते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्ट म्हणाली की, बालपणापासूनच पैशांच्या बाबतीत ती अस्वस्थ होती आणि ती वेळेनुसार मॅनेजमेंट करायला शिकली आहे. आलिया म्हणाली की, आपल्या बजेटचे कसे मॅनेजमेंट करावे हे तिला माहित आहे. आणि ती बाँड्ससह म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करते. आलिया स्वत: कबूल करते की, ती आता जास्त खर्च करत नाही. तिचा सीए देखील तिला खर्च करण्याचा सल्ला देतो.

आलिया भट्ट कधी कधी फॅंसी बॅग किंवा कपड्यांवर खर्च करते. आलिया पूर्वी तिच्या आईवडिलांबरोबर लंडनला जायची, आज लंडनमध्ये तिचे स्वत:चे घर आहे. तिनी सांगितले की, मुंबईत जे घर आहे ती अशी प्रॉपर्टी आहे. जी तिने विकत घेतली आहे. आलिया आता कमी खर्च करते, परंतु तिची विश लिस्ट बरीच लांब आणि विस्तृत आहे.

आलियाने सांगितले की, आता तिला स्वत: चे खासगी विमान खरेदी करायचे आहे. डोंगरावर घर विकत घेण्याचेही तिचे स्वप्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्टने सन 2019 मध्ये 59.21 कोटी रुपये कमावले आहेत. त्याच बरोबर, वर्ष 2018 मध्ये ती या यादीमध्ये 12 व्या स्थानावर असून तिने गेल्या वर्षी 58.83 कोटी रुपये कमावले होते.