×
HomeमनोरंजनRRR च्या शूटिंगसाठी हैदराबादला रवाना झाली आलिया भट ! एअरपोर्टवर दिसला 'असा'...

RRR च्या शूटिंगसाठी हैदराबादला रवाना झाली आलिया भट ! एअरपोर्टवर दिसला ‘असा’ अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन – बाहुबली (Baahubali) चे डायरेक्टर एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) त्यांच्या मेगा बजेट प्रोजेक्ट आरआरआर RRR वर काम सुरू करणार आहे. बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgan), ज्युनियर एनटीआर (Jr. NTR), राम चरण (Ram Charan), आलिया भट (Alia Bhatt), ओलिव्हिया मॉरिस (Olivia Morris) हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. आरआरआर या सिनेमाचं एक मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे.

व्हायरल होतोय आलियाचा फोटो

आलिया रविवारी (दि. 6 डिसेंबर 2020) या सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईहून हैदराबादला रवाना झाली आहे. रविवारी आलिया प्रायव्हेट एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी आलिया ग्लॅमरस अंदाजात दिसली.

आलियाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांना तिचा लुक खूप आवडला आहे. चाहतेही तिच्या फोटोंवर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

आरआरआर सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर राजामौली बाहुबली सिनेमानंतर आता या सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं ज्युनियर एनटीआर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा सिनेमा अनेक भारतीय भाषांसोबतच तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही रिलीज होणार आहे.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News