दीपिकाला पिछाडीवर टाकत ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वात ‘SEXY’ आशियाई महिला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची टॉप स्टार दीपिका पादुकोणला मागे टाकत अभिनेत्री आलिया भट यंदाची सर्वाधिक सेक्सी आशियाई महिला ठरली आहे. यंदा जरी दीपिका मागे पडली असली तरी संपूर्ण दशकातील सर्वात सेक्सी आशियाई महिला मात्र दीपिका पादुकोण ठरली आहे. दीपिका आणि आलिया यांच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.

https://www.instagram.com/p/B4xgmrjjrBu/

लंडनच्या ईस्टर्न आय या मासिकानं केलेल्या सर्वेक्षणानंतर सर्वाधिक सेक्सी आशियाई महिलांची यादी जाहीर केली आहे. यात ऑनलाईन वोटींग, मीडिया कव्हरेज आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यामध्ये आलिया सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरली आहे. सर्वात सेक्सी आशियाई महिला ठरल्यानंतर आलिया म्हणते, “जे बाहेर दिसते ते सौंदर्य नसून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात यावरून तुमचे सौंदर्य ठरते. मनाने सुंदर असाल तर तुम्ही कायम सुंदर दिसता.”

https://www.instagram.com/p/B5nu-EklLpX/

गेल्या वर्षी हा किताब दीपिकानं मिळवला होता. यंदा आलियानं तिला मागे टाकलं आहे. दीपिका यंदाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी या दशकातील सर्वात सेक्सी आशियाई महिला मात्र दीपिकाच आहे.

https://www.instagram.com/p/B55WOBIJmUO/

इतर काही अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर टीव्ही स्टार हिना खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लवकरच ती बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

https://www.instagram.com/p/B3u_7rbhj7c/

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानातील सर्वात सेक्सी महिला म्हणून पाचव्या वर्षी माहिरानं आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

https://www.instagram.com/p/B5IMGAIHsn2/

सुरभी चंदना हिनं या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे.

https://www.instagram.com/p/B52_aGKBC5K/

कॅटरीना कैफ या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. कॅटनंतर शिवांगी जोशी, निया शर्मा, मेहविश हयात यांचा क्रमांक लागतो.

https://www.instagram.com/p/B4HPLUpl4yG/

https://www.instagram.com/p/B5vJQxdF6Jl/

https://www.instagram.com/p/B4Sec9slyFj/

देसी गर्ल प्रियंका चोपडा या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.

https://www.instagram.com/p/B21xhAKnmUj/

 

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/