अचानक रुग्णालयात दाखल झाली होती आलिया भट ! दुसऱ्याच दिवशी सेटवर झाली हजर, जाणून घ्या नेमकं प्रकरण

बॉलिवूड ॲक्ट्रेस आलिया भट (Alia Bhatt) हिनं अलीकडेच संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) डायरेक्टेड गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) सिनेमाची शुटींग सुरू केली आहे. हा सिनेमा डिसेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं सिनेमाच्या शुटींगला ब्रेक लागला होता. यानंतर पुन्हा शुटींग सुरू झाली होती. परंतु एका दिवसापूर्वीच सिनेमाची लिड ॲक्ट्रेस आलिया भटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आलिया भट दीर्घकाळाच्या ब्रेकनंतर डिसेंबर 2020 मध्ये पुन्हा शुटींगसाठी रणथंभौर नॅशनल पार्कमध्ये होती. यानंतर तिनं शुटींग सुरू केली होती. परंतु जास्त थकवा आल्यानंतर रविवारी (दि 17 जानेवारी) तिला मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. काही वेळ आराम केल्यानंतर तिला त्याच दिवशी सुट्टी देण्यात आली. यानंतर सोमवारी लगेच ती शुटींगसाठी गंगुबाईच्या सेटवर परत आली.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या माफीया क्विन ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारीत आहे. या सिनेमात गंगुबाईचा रोल आलिया भट्ट साकारत आहे. 11 सप्टेंबर 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही. आता हा सिनेमा 2021 मधील दिवाळीत रिलीज करण्याचा प्लॅन आहे. रिपोर्टनुसार सिनेमात करीम लालाचाही उल्लेख असेल.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं आलिया-रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याशिवाय आलिया करण जोहरच्या तख्त सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे गंगुबाई काठियावाडी हा सिनेमादेखील आहे.