‘या’ चित्रपटात आलिया भट्ट वडिलांसोबत करणार काम ….साकारणार ‘ही’ भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फार कमी वेळात बॉलिवुडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा आगामी ‘सडक २’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये काम करण्याची तिला खुप उत्सुकता लागली आहे. याचे कारण हे की, यामध्ये तिला तिचे वडिल दिग्दर्शक महेश भट्ट हे असणार आहे. यामध्ये वडिलांसोबत काम करायला मिळणार त्यामुळे ती खुप खुश आहे.

‘कलंक’ चित्रपटाच्या अपयशानंतर ती पुन्हा एकदा उत्साहाने कामाला सुरुवात करत आहे. तिचे वडिल महेश भट्ट यानी तब्बल दोन दशकानंतर ते पुन्हा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ‘सडक २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट करणार आहे. महत्वाचे म्हणजे आपल्या मुलीला ते स्वतः डायरेक्ट करणार आहे. तिच्या मुख्य भूमिकेची उत्सुकता तिला फार लागली आहे.

‘सडक २’ या चित्रपटात आलियाची मुख्य भूमिका असणार आहे. यामध्ये ती एका अंधश्रद्धा व भोंदुगिरी करण्याचे काम जे करतात त्यांच्या विरोधात काम करणार आहे. या कामासाठी संजय दत्त तिची मदत करताना दिसणार आहे. त्याचबरोबर आदित्य राय कपूर, पूजा भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. १९९१ साली ‘सडक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी खुप चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. याची कथा अशी की, संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्याक येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो व यानंतर दलालापासून तिला वाचवतो. हिच कथा पुढे नेत पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार असून संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखविली जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.