कार्तिक आर्यनसोबत बेड शेअर करायला आवडेल, ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीच्या मुलीनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबातील तिसरी पिढी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. जवानी जानेमन सिनेमातून अलिया फर्निचरवाला डेब्यू करणार आहे. अलिया फर्निचरवाला हे नाव तिनं स्वत: लाँचिंगदरम्यान निवडलं आहे. याआधीही तिचं नाव अलिया इब्राहिम आणि अलिया फर्निचरवाला लिहलं जात होतं. अलियाच्या वडिलांचं नाव फरहन फर्निचरवाला आहे. पूजा बेदी असं तिच्या आईचं नाव आहे.

सध्या अलिया जवानी जानेमान सिनेमाच्या प्रोमशनमध्ये व्यस्त आहे. एका चॅट शोमध्ये तिनं एका अभिनेत्याला घेऊन बेड शेअर करण्याबाबत वक्तव्य केलं आहे. एका चॅट शोमध्ये बोलताना तिला विचारण्यात आलं की, अचानक जर बेडवर कार्तिक आर्यन दिसला तर काय करशील? यावर अलिया म्हणाली, “कार्तिक आर्यनसोबत बेड शेअर करायला मला काहीच आश्चर्य वाटणार नाही.

याशिवाय तिला विचारण्यात आलं की, सारा आणि कार्तिकच्या लव आजकल 2 मधील बोल्ड सीन्सबद्दल तिचं काय मत आहे. यावर उत्तर देताना अलिया म्हणाली, “त्या सिनेमाचा ट्रेलर मी पाहिला आहे. जर मी त्या सीन्समध्ये मी असते तर मीही ते सीन्स इतकेच दमदार केले असते. दोघांनी चांगले सीन्स दिले आहेत.” असंही तिनं सांगितलं.