44 वर्षीय अमिषा पटेलनं पुन्हा एकदा दाखवला Bold बिकिनी अवतार ! सोशलवर ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अमिषा पटेल (Ameesha Patel) सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. असं असलं तरी अमिषा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते. सध्या अमिषा काही अतरंगी फोटोंमुळे चर्चेत येत असते. 44 वर्षीय अमिषा आजही हॉट अवतार फ्लाँट करत असते. आपल्या बोल्ड फोटोंमुळं ती अनेकदा चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा तिनं स्विम सूटमधील हॉट अवतार दाखवला आहे, ज्यामुळं सोशलवर ती चर्चेचा हिस्सा बनत आहे. तिच्या या बिकिनी लुकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अमिषानं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा खूपच बोल्ड आणि हॉट अवतार दिसत आहे. यात अमिषानं ब्लू कलरची बिकिनी घातली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोज देत तिनं काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच मादक दिसत आहे.

अमीषानं एका मागे एक अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. वेगवेगळ्या फोटोत ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

अमिषाच्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचे फोटो लाईक आणि शेअरही केले आहेत. अनेकांनी तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

अमिषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर धमाकेदार पद्धतीनं आपल्या करिअरला सुरुवात करणारी अमिषा आता सिनेमात दिसत नाही. अनेक इव्हेंटमध्ये ती दिसत असते. अनेक फॅशन शोज आणि फॅशन ब्रँडला ती कनेक्टेड आहे. तिनं सिनेमात कमबॅक करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती फ्लॉप झाली. 2000 साली आलेल्या कहो ना प्यार है या सिनेमातून तिनं हृतिक रोशनसोबत डेब्यू केला होता.

 

You might also like