अमेरिकी सिंगर ट्रेलरनं साधला राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर निशाणा, आतापर्यंत मिळाले 20 लाख ‘लाइक्स’ आणि 4 लाखाहून अधिक ‘रिट्विट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकन गायक टेलर स्विफ्टचे एक ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 29 मे रोजी झालेल्या या ट्विटला अवघ्या दोन दिवसांत 2 मिलियन म्हणजेच 20 लाख पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. ट्विटरवर हे 4 लाखांहून अधिक वेळा रीट्वीट केले गेले आहे. हे टेलर स्विफ्टचे आतापर्यंतचे सर्वांत आवडलेले ट्विट बनले आहे. दरम्यान, या ट्विटमध्ये टेलरने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहेत.

टेलरने आपल्या ट्विटमध्ये अमेरिकेत नुकत्याच झालेल्या वांशिक घटनांबाबत ट्रम्पविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘वंशभेद आणि व्हाइट सुप्रीमेसीमध्ये संपुर्ण प्रेसेंडेन्सीला झोकल्यानंतर आता तुम्ही हिंसाचाराची धमकी देण्यापूर्वी नैतिकतेविषयी बोलत आहात का? , ‘ ‘वेन द लूटिंग स्टार्ट, शूटिंग स्टार्ट’? आम्ही नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदान करू’. दरम्यान, ट्रम्पच्या ट्विटनंतर ट्रेलरची ही प्रतिक्रिया आली.

ट्रम्प यांचे विधान
अमेरिकेत सध्या हिंसाचार सर्वत्र पसरलेला आहे. पोलिस कोठडीत एक काळा अमेरिकन व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूमुळे झालेल्या हिंसाचाराने बरीच खळबळ उडाली आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले, ज्यात त्यांनी ‘ वेन द लूटिंग स्टार्ट, शूटिंग स्टार्ट ‘ असा नारा वापरला. हा नारा 1967 मध्ये मियामी पोलिस अधिकारी वॉल्टर यांनी वापरला होता. त्याचा वापर त्याने फ्लोरिडामधील हिंसाचारासाठी केला होता. ज्याला खूप विरोधही झाला होता. ट्रम्प यांच्या या ट्विटलाही विरोध केला जात आहे. दरम्यान, आता ते ट्विट हटविण्यात आले आहे. या प्रकरणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हंटले कि, त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. ते म्हणाले की, जेव्हा लूट सुरू होते तेव्हा पोलिस गोळीबार करतात आणि निष्पाप लोकांचा मृत्यू होतो. दरम्यान, अमेरिकेत आता या प्रकरणावर निषेध सुरू आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like