Video : ‘आमिर’ची लाडकी इरा खानचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘वयाच्या 14 व्या वर्षीच झालं शारीरिक शोषण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड फोटोमुळे ती नेहमी बातमीत असते. काही दिवसांपूर्वी इरा आपल्या डिप्रेशनच्या खुलाशावरून चर्चेत आली होती. 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डेवर इराने आपले सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यामध्ये इराने हा खुलासा केला होता की, चार वर्षापासून ती डिप्रेशनमध्ये आहे. तिचा उपचार सुद्धा सुरू आहे आणि ती खुप ठिक आहे. तर, आता इराने आपल्या जीवनाबाबत आणखी एक खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्ही सुद्धा नक्कीच हैरान व्हाल.

इराने पुन्हा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या सोबत घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांबाबत उल्लेख करत आहे. लहानपणापासून आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींसाठी ती रडली आहे किंवा कोणत्या गोष्टींमुळे ती मजबूत बनली आहे, हे सर्व तिने या व्हिडिओत सांगितले आहे. यासोबतच व्हिडिओत इराने आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटावर सुद्धा भाष्य केले आहे. या सर्व गोष्टींशिवाय इराने स्वत: बद्दल एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे.

इराने व्हिडिओमध्ये सांगितले की, जेव्हा ती 14 वर्षांची होती, तेव्हा तिचे शारीरीक शोषण झाले होते. तेव्हा तिला समजले नाही की, तो व्यक्ती तेव्हा काय करत आहे. हे समजण्यासाठी एक वर्ष लागले की, तो काय करत होता. त्या माणसाचा हेतू काय होता. यानंतर मी याबाबत माझ्या आई-वडिलांना सांगितले आणि नंतर सर्व गोष्टी हळुहळु ठिक झाल्या. मात्र, नंतर मला विचार केल्यावर राग येत होता की, मी असे कसे होऊ दिले, परंतु तेव्हा जे व्हायचे होते ते झाले होते.

इराने या व्हिडिओत सांगितले की, अनेकजण तिला विचारतात की, ती डिप्रेशनमध्ये का आहे? मात्र ती सांगते, याचे उत्तर तिला देखील माहिती नाही. इरानुसार, घटस्फोट होऊनही तिचे आई-वडिल चांगले मित्र आहेत, तिचे मित्र खुप चांगले आहेत, तिला पैशांची कसलीही कमतरता नाही, परंतु हे सर्व असूनही ती डिप्रेशनमध्ये आहे.