फक्‍त ५००० रूपयांसाठी बिग बी अमिताभने केला होता सिनेमा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन सध्या जरी आपल्या अटींवर काम करत असले तरी नेहमीच त्यांची अशी स्थिती नव्हती. आजच तो दिवस आहे जेव्हा अमिताभ बच्चन यांना अनेक ठिकाणांहून नकार मिळाल्यानंतर पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्तानी’ मिळाला होता. या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांना ५ हजार रुपये देण्याचा करार झाला होता.

सेल्स एक्झिक्युटीवची नोकरीही गेली

अमिताभ यांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. त्यांनी शाळा महाविद्यालयात असताना अनेक नाटकात भाग घेतला होता. याच दिशेने ते करिअर बनवण्याचा विचार करत होते. परंतु एका मिडल क्लास फॅमिलीतून असल्याने घरच्यांना वाटायचं की, त्यांनी नोकरी करावी. यानंतर अमिताभ कोलकात्यातील बर्ड अँड कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटीवच्या पदावर काम करू लागले. तिथे त्यांना १४०० रुपये महिना सॅलरी होती. परंतु नोकरीत मन न लागणं आणि अ‍ॅक्टींगकडे असणारा त्यांचा कल यामुळे त्यांनी नोकरी सोडली.

टॅलेंट हंटमध्ये पाठवले फोटो

अमिताभ यांनी फिल्म स्टार टॅलेंट हंट स्पर्धेत आपले फोटो पाठवले होते. परंतु यात त्यांची निवड झाली नाही. अमिताभ यांची स्थिती पाहता कुटुंबाने त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. परंतु असे असूनही काही खास घडताना दिसले नाही. त्यांच्या आवाजामुळे त्यांची आकाशवाणीमध्येही निवड झाली नव्हती.

भाऊ अजिताभनेही दिली साथ

जेव्हा कुटुंबात सर्वांच एकमत झालं की आता अमिताभ केवळ अभिनेताच बनणार आहे. तेव्हा भाऊ अजिताभ यांनीही त्यांचे फोटो इकडे तिकडे पाठवण्यास सुरुवात केली. अशातच ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सिनेमाची माहिती अजिताभ यांना मिळाली होती. त्यांनीच अमिताभ यांचा फोटो आणि बायोडाटा पाठवला. यानंतर ख्वाजा अहमद अब्बास यांनी हरिवंश राय बच्चन यांच्याशी बोलून अमिताभ यांना काम दिलं.

अमिताभ यांची इंडस्ट्रीतील ५० वर्षे

अमिताभ बच्चन यांनी फिल्म इंडस्ट्रीत ५ हजार रुपयांपासून सुरु केलेल्या या प्रवासाला एक परफेक्ट डेस्टिनेशन बनवलं आहे. आपल्या ५० वर्षांच्या काळात त्यांनी अनेक प्रकारचे सिनेमे केले आहेत. आता ते १०० हून अधिक सिनेमे करत आहेत. परंतु चकित करणारी बाब अशी की, आजही ते सिनेमात तितक्याच उत्साहाने काम करत आहेत. अमिताभ मागील वर्षी आलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमात आमिर खानला तलवारबाजी मध्ये टक्कर देताना दिसले होते.

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

 

Loading...
You might also like