धक्कादायक ! ‘बिग बी’चं यकृत 75% खराब, अमिताभ बच्चननं स्वतः दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमिताभ बच्चन सध्या एका गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. नेहमी फिट आणि अ‍ॅक्टिव्ह असलेल्या बिग बींचे 75 टक्के लिव्हर खराब झाला आहे. केवळ 25 टक्के काम करत असलेल्या लिव्हरच्या साहाय्याने जगत आहेत अशी माहिती एका टीव्ही शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. आपल्या आरोग्याबाबत नेहमीच आग्रही असलेले अमिताभ बच्चन यांच्या आजाराविषयी ऐकून असंख्य चाहत्यांना धक्काच बसला आहे.

एका टीव्ही कार्यक्रमात अमिताभ बच्चन उपस्थित होते. येथे आरोग्याविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘व्यक्तीने आपल्या शरीराची नियमित तपासणी केली पाहिजे. मला क्षयरोगाचा त्रास आहे आणि बर्‍याच समस्या आहेत. जर हे रोग वेळेवर माहित असतील तर त्यांचे उपचार करणे शक्य आहे.’

अमिताभ आपल्या फिटनेस विषयी खूपच जागरूक आहेत. ते नियमित व्यायामाबरोबरच फिरायलाही जातात. दिवसभर ते खूपच सक्रिय असतात. ‘कौन बनेगा करोडपती’ च्या येणाऱ्या नव्या सीझनमुळे अमिताभ बच्चन सध्या चर्चेत आहेत. 9 ऑगस्टपासून कौन बनेगा करोडपती’ चे 11 वे सीझन सुरु झाले आहे. अमिताभ बच्चन यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘गुलाबो सीताबो’ चे शूटिंगही सुरू आहे. ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ नावाच्या चित्रपटाचे कामही सुरू आहे. या चित्रपटाचे पोस्टरही प्रसिद्ध झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like