‘बिग बीं’ची हिरोईन आणि माजी मिस इंडिया ‘या’ अभिनेत्रीची कॅन्सरची ‘झुंज’, आता दिसते ‘अशी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बी अमिताभ बच्चनसोबत मेजर साहब या सिनेमात त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नफीसा अली सोढी सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. असे असतानाही नफीसा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असतात. सध्या त्या त्यांच्याच व्हायरल होणाऱ्या एका फोटोमुळे चर्चेत आल्या आहेत. अ‍ॅक्ट्रेस आणि नेता नफीसा अली यांनी 1976 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यांचा हा फोटो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

नफीसा यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चा एक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला होता. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “19 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर मी. हा फोटो माझे वडिल अहमद अली यांनी काढला होता.”

नफीसा यांचा हा फोटो सोशलवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जाताना दिसत आहे. कॅन्सरमुळे नफीसा यांच्या लुकमध्ये खूपच बदल झाला आहे. त्यामुळेच फोटो खूप व्हायरल होत आहे. नफीसा मिस इंटरनॅशनल 1977 च्या रनर अप राहिल्या आहेत.

नफीसा यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जुनून या सिनेमातून अ‍ॅक्टींग करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी 9 सिनेमात काम केलं आहे. नफीसा यांनी शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि सलमान खान यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/