‘कोरोना’ पॉझिटिव्ह झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या आरोग्यासंबंधी आली ‘दिलासादायक’ बातमी, जाणून घ्या ‘अपडेट’ (व्हिडीओ)

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. शनिवारी रात्री त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की त्याच्या कुटुंबियांसह स्टाफ सदस्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन नंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी आता हॉस्पिटलमधून अमिताभ बच्चन यांच्या आरोग्याबाबत अपडेट आले आहेत. ज्यात आता त्यांची तब्येत कशी आहे हे सांगितले जात आहे. अमिताभ बच्चन यांच्या या हेल्थ अपडेटने दिलासादायक बातमी आणली आहे.

मुंबईतील नानावटी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी स्वत: अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता स्थिर आहे, त्यांच्यात सौम्य लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त त्यांना रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारण्याची ही बातमी जाणून त्यांचे चाहते आणि जवळचे मित्र आनंदित होतील.

जेव्हा अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे खूप कमी होती. अभिषेक बच्चन यांनी स्वत: ट्विट करुन याबद्दल माहिती दिली. याशिवाय आपल्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची त्यांच्याविषयी असणारी काळजी लक्षात घेत अमिताभ बच्चन यांनी रात्री रुग्णालयात दाखल असूनही सोशल मीडियावर पोस्ट करून स्वत:बद्दल माहिती दिली.

त्यांनी लिहिले की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यानंतर मी रुग्णालयात दाखल झालो असून रुग्णालयाकडून प्रशासनाला माहिती दिली जात आहे. कुटुंब आणि कर्मचार्‍यांची चाचणी घेण्यात आली असून त्यांचा चाचणी अहवाल येणार आहे. या व्यतिरिक्त गेल्या 10 दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.’