जया यांच्या वक्तव्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर वाढविण्यात आली ‘सुरक्षा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संसदेत जया बच्चन यांच्या विधानानंतर बिग बी च्या घराबाहेरची सुरक्षा आणखी मजबूत करण्यात आली आहे. खरं तर, जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत त्या कारणामुळे त्यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या जुहू येथील घराबाहेर मुंबई पोलिसांनी सुरक्षा अधिक कडक केली आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्स कनेक्शनच्या मुद्द्यावर जया बच्चन यांनी संसदेत सांगितले की बॉलिवूड इंडस्ट्रीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर, मुंबई पोलिसांनी त्यांच्या जुहूमधील ‘जलसा’ या बंगल्याच्या बाहेर अतिरिक्त सुरक्षा पुरविली आहे.

वास्तविक, गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशात आणि बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण आणि तस्करीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की भारतीय चित्रपट उद्योगात मादक पदार्थांचे व्यसन बरेच जास्त आहे. बरेच लोक पकडले गेले आहेत. एनसीबी खूप चांगले काम करत आहे. केंद्र सरकारने आवाहन केले आहे की यावर कडक कारवाई करावी, दोषींना लवकरात लवकर अटक करुन त्यांना शिक्षा करावी जेणेकरून शेजारील देशांचे षडयंत्र संपुष्टात येऊ शकेल.

रवि किशन यांच्या या विधानावर जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की काल आमच्या खासदार सदस्यांपैकी एकाने लोकसभेत बॉलिवूडविरूद्ध वक्तव्य केलेत. हे लाजीरवाणे आहे. मी कोणाचे नाव घेत नाही. ते स्वत: इंडस्ट्रीतील एक आहेत. ते ज्या थाळीत खातात त्याच थाळीत घाण करतात. हे चुकीचे आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like