‘बिग बी’ अमिताभनं ‘जया-श्वेता’सोबत गुपचूप घेतला सेल्फी ! म्हणाले- ‘कुटुंब कामावर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या फेमस शो कौन बनेगा करोडपतीचं (Kaun Banega Crorepati) सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ बच्चन सोशलवर कायमच अ‍ॅक्टिव्ह असतात. सध्या ते पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा सोबत एका प्रोजेक्टरवर काम करत आहेत. अमिताभनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्याला मजेदार कॅप्शन दिलं आहे.

अमिताभ यांनी इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, कुटुंब कामावर. बिग बींनी दिलेलं कॅप्शन वाचल्यानंतर असं वाटत आहे की, बच्चन कुटुंबाला एक प्रोजेक्ट मिळाला आहे. ज्यात सर्वजण दिसणार आहेत. फोटोत जया बच्चन आणि श्वेता बच्चन मास्क परिधान करून बसल्याचं दिसत आहे. अमिताभनं गुपचूप फोटो क्लिक केल्याचं दिसत आहे.

लुकबद्दल बोलयाचं झालं तर अमिताभ यांनी गोल्डन कलरची शेरवानी घातली आहे, तर जया बच्चन आणि श्वेता या साडी नेसून लग्नासाठी तयार असल्याचं दिसत आहे. बिग बीचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शूटिंग झाली आहे.