‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यंदाच्या 66 व्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी महानायक अमिताभ बच्चन यांची निवड केल्याची घोषणा केली आहे. सर्वांच्या सहमतीने अभिनेते अमिताभ बच्चन यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वश्रेष्ठ दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून बिग बी अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले आहे. अमिताभ बच्चन यांनी दोन पिढ्यांचे मनोरंजन केले आहेत. त्यामुळे त्यांनी निवड यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय या निर्णयाने आनंदी आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन असे जावडेकर यांनी ट्वीट केले आहे.

अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.

Visit : policenama.com