फिटनेसच्याबाबतीत 19 वर्षांच्या नातवाला टक्कर देतायेत ‘बिग बी’ अमिताभ ! फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लॉकडाऊनमध्ये बिग बी अमिताभ बच्चन जरा जास्तच फिटनेस फ्रिक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत.अलीकडेच बिग बींनी जीमचा जो फोटो शेअर केला आहे तो पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.

फिटनेसच्या बाबतीत 77 वर्षीय बिग बी आपल्या 19 वर्षाच्या नातवाला टक्कर देत आहे. बिग बी अमिताभानं नातू अगस्त्य नंदासोबतचा एक फोटो इंस्टावरून शेअर केला आहे. यात दिसत आहे की ते मीरर समोर उभे आहेत.

फोटोत दिसत आहे की, बिग बी आणि अगस्त्य दोघांच्या हातात डंबल आहेत आणि आरशासमोर उभं राहून त्यांनी पोज दिली आहे. यात बिग बी यांची एनर्जी आणि त्यांचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. एवढं वर्कआऊट करूनही ते खूप उत्साही वाटत आहे. बिग बींचा हा फोटो सध्या व्हायरल होत असून चाहतेही यावर कमेंट करताना दिसत आहेत.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.