श्वेता नंदाच्या बर्थडेला अमिताभ बच्चन यांनी शेयर केले Unseen Pic, नव्या नवेलीने विशेष प्रकारे केले WISH

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमिताभ बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चन नंदा आज आपला स्पेशल डे साजरा करत आहे. बिग बी यांची मुलगी श्वेता आज 47 वर्षांची झाली आहे. श्वेता बच्चन चित्रपटांपासून दूर राहिली असली तरी ती कायम चर्चेत राहिली आहे. या खास प्रसंगी तिला कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांकडून भरपूर शुभेच्छा मिळत आहेत. परंतु तिच्या चाहत्यांमध्ये सर्वात पहिले नाव आहे तिचे वडील म्हणजेच अमिताभ बच्चन आणि तिची मुलगी नव्या नवेली नंदाचे.

मुलीच्या 47व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी तिचे लहानपणीचे एक छायाचित्र ट्विटरवर शेयर केले असून कॅपशनमध्ये लिहिले आहे – ’मुली सर्वात चांगल्या असतात… आणि श्वेताला शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद.

बिग बी यांनी दोन ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रे पोस्ट केली आहेत. एक छायाचित्र श्वेताच्या बालपणीचे आहे, ज्यामध्ये ती वडीलांच्या कुशीत आहे. दुसरे काही दिवसांपूर्वीचे आहे. जे एका फोटोशूटचे आहे. दोघे कॅमेर्‍यासमोर पोझ देत आहेत.

बिग बी यांच्यासह मुलगी नव्या नवेली नंदाने सुद्धा आपल्या आईला बर्थडे विश केले आहे. नव्याने रात्री एक फॅमिली फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला. या छायाचित्रात ती आपली आई श्वेता, वडील निखिल नंदा आणि भाऊ अगस्त्य नंदा यांच्यासोबत दिसत आहे. तिने कॅपशनमध्ये लिहिले आहे – वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी आणि पापा…तुमच्यापेक्षा चांगले काही नाही.

श्वेता बच्चन नंदाचा जन्म भारतात झाला होता, मात्र नंतर ती उच्च शिक्षणासाठी स्विझर्लंडला गेली होती. अनेक वर्ष तिथे काढल्यानंतर श्वेता पुन्हा भारतात आली. चित्रपटाशी संबंधीत कुटुंबात जन्म होऊनही श्वेता पडद्यापासून दूर राहिली. 1997 मध्ये श्वेताने बिझनेसमॅन निखिल नंदा यांच्याशी विवाह केला. दोघांना दोन मुले नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा आहेत. एका मुलाखतीमध्ये श्वेताने सांगितले होते की, ती हाऊसवाईफचे जीवन एन्जॉय करत आहे.