‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी ‘हा’ फोटो शेअर करून मानले चाहत्यांचे ‘आभार’
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर बॉलीवूडमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चिंता दिसून आली होती. नंतर अभिषेक बच्चन याचाही रिपोर्ट पॉसिटीव्ह आला होता. त्यामुळे ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या दोघींना कॉरंटाइन केले होते. चार दिवसानंतर ऐश्वर्या आणि आराध्या दोघींची तब्येत बिघडल्याने त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. जया बच्चन सोडता आता सर्व बच्चन कुटुंब नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. यादरम्यान अमिताभ बच्चन विविध समाजमाध्यमाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. ते समाजमाध्यमावर आपल्या तब्येतीची वारंवार माहिती देऊन ठीक असल्याचे सांगत आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांचे आभारही मानले आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसा हा फोटो बराच जुना असून यामध्ये सर्वजण चाहत्यांना अभिवादन करताना दिसून येत आहेत. या फोटोखाली लिहलेल्या कॅप्शनमध्ये अमिताभ यांनी सर्व चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहे.
अमिताभ बच्चन यांनी टाकलेला हा फोटो समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणात येत आहेत. सर्व चाहते अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा देत असल्याचेही दिसून येत आहेत. याअगोदरही अमिताभ यांनी अभिषेक सोबतचा एक फोटो समाजमाध्यमावर टाकला होता, यावरील चाहत्यांच्या प्रतिक्रियांचेही अमिताभ बच्चन यांनी आभार मानले आहे.
सध्या अमिताभ बच्चनसोबत सगळ्यांची तब्येत सुस्थितीत आहे. सर्वजण अजून नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.