Birth Anniversary : बॉलिवूडमधील ‘तो’ विलन ज्याच्यासमोर हिरोही वाटायचा ‘फिका’, अ‍ॅक्टींगासाठी सोडली होती 21 वर्षांची नोकरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील दिग्गज स्टार आणि एक खतरनाक विलेन अमरीश पुरी यांची आज बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. 15 वर्षांपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या शानदार अभिनयानं आजही ते चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. अमरीश पुरी यांची पर्सनॅलिटीच अशी होती की, जेव्हा ते पडद्यावर हिरो सोबतच दिसायचे तेव्हा त्यांच्या समोर मोठ्यात मोठा स्टारही फिका वाटत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

अनेकांना हे माहिती नसेल की, अमरीश पुरी यांनी बॉलिवूडमध्ये येण्याआधी जवळपास 2 दशकं एका वीमा कंपनीत काम केलं. एका वीमा कंपनीचा कर्मचारी म्हणून त्यांनी 2 दशकांचा आयुष्यातील वेळ नोकरीला दिला.

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आणि आपल्या अॅक्टींगच्या प्रेमासाठी त्यांनी आपली 21 वर्षांची नोकरी सोडून दिली. त्यांना खूप आधीपासूनच थिएटरचा शौक होता. फक्त त्यांना योग्य संधी मिळत नव्हती. नंतर एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना एका प्लेमध्ये काम मिळालं आणि ते प्रसिद्ध थिएटर आर्टीस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर त्यांनी रायटर डायरेक्टर सत्यदेव दुबेंचा सहाय्यक म्हणून काम केलं.

1971 साली आलेल्या रेश्मा और शेरा या सिनेमातून अमरीश पुरी यांना सिनेमात पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमातील अमरीश पुरी यांच्या अॅक्टींगचं खूपच कौतुक झालं. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. हळूहळू अमरीश पुरी खलनायकाच्या दुनियेतील एक अमर भूमिका बनले. त्यांचा डायलॉग मोगॅम्बो खुश हुआ आजही मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठांवर असतो.