जेव्हा अमृता सिंहनं सैफसाठी गायलं ‘रोमँटीक’ गाणं, आनंदाच्या भरात अभिनेत्यानं केलं Kiss ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि त्याची एक्स वाईफ अॅक्ट्रेस अमृता सिंह यांचा एक जुना व्हिडीओ सध्या समोर आला आहे जे व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सिमी गरेवालच्या शोमधील आहे.

इंस्टावरून शेअर करण्यात आलेल्या व्हि़डीओत दिसत आहे की, अमृता सैफला पाहून एक रोमँटीक गाणं म्हणत आहे. राजेश खन्ना यांच्या अमर प्रेम या सिनेमातील प्रसिद्ध गाणं तुम आ गए हो नूर आ गया है हे गाणं अमृता सैफसाठी गात आहे. अमृता सिंहनं गाणं गायल्यानंतर सैफ लगेच स्माईल करत तिला प्रेमानं किस करताना दिसत आहे.

सैफनं 1991 मध्ये अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं. दोघांचं लग्न खूप चर्चेत राहिलं. कारण सैफ अॅक्ट्रेस अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान होता. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. सारा अली खान आणि इब्राहिम. 2004 मध्ये दोघं वेगळे झाले. 2012 मध्ये सैफनं करीना कपूरसोबत लग्न केलं.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तान्हाजी नंतर आता तो जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. 31 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अलाया फर्निचरवाला आणि तब्बू प्रमुख भूमितकेत होत्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like