अनन्या पांडेच्या बहिणीच्या ‘बोल्ड’ बिकिनी फोटोवर आक्षेपार्ह कमेंट, ‘अलाना’नं दिलं जोरदार ‘प्रत्युत्तर’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची पुतणी आणि अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे नेहमीच चर्चेत असते. याचे कारण म्हणजे अलाना पांडेचे सोशल मीडियावरील फोटो. बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अलाना स्टार झाली आहे. सोशलवर अलानाची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आपल्या बिकीनी फोटोंमुळे अलाना पुन्हा चर्चेत आली आहे. ज्यात अलाना कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे. यावेळी मात्र या फोटोंमुळं अलानावर अनेकांनी टीका करत तिला ट्रोल केलं आहे. काहींनी आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. परंतु यानंतर अलानानं देखील त्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CBLisxBhNzB/

अलानानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं तिचं स्टेटमेंट दिलं आहे. यात तिनं तिच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. आपल्या स्टेटमेंटमध्ये अलाना म्हणते, “एका महिलेनं माझ्या पोस्टवर कमेंट केली की, माझ्यासोबत काही वाईट घडलं पाहिजे कारण मी बिकिनीत फोटो शेअर केला आहे. त्या महिलेनं माझ्या आईवडिलांनाही यात टॅग केलं होतं जेणेकरूनन ते हे सगळं पाहू शकतील.”

https://www.instagram.com/p/CAuAUz8hlFO/

अलाना पुढं म्हणते, “काश मी स्क्रीनशॉट घेऊ शकले असते. परंतु त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी त्या महिलेला ब्लॉक केलं आणि ती कमेंटही डिलीट केली. मी जेव्हा तिच्या प्रोफाईलला गेले तेव्हा मला दिसलं की, तिचं लग्न झालं आहे. तिला एक मुलगी आहे तीही माझ्याहून लहान. मला कळत नाही की, तुम्ही दुसऱ्यांच्या मुलाबद्दल असा विचार कसा करू शकता”

अलानाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर डिझायनर मोनीषा जयसिंह यांचा मुलगा युडी जयसिंहसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. हॉलिडे असो वा पार्टी दोघे नेहमीच एकत्र दिसत असतात. युडी अलानाच्या कजिन सिस्टरच्या बॉयफ्रेंडचाच भाऊ आहे. अनन्या चंकी पांडेची मुलगी आणि अलानाची कझिन सिस्टर आहे जी मोनिषा जयसिंहचा मुलगा आणि युडीचा भाऊ करण जयसिंहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

https://www.instagram.com/p/B-gXVZLBi4Z/