मैत्रिणीच्या लग्नात अनन्या पांडेनं केला ‘सारा’च्या ‘लडकी आँख मारे’ गाण्यावर ‘भन्नाट’ डान्स (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनन्या पांडे नुकतीच आपली जवळची मैत्रीण ईशा बियानी आणि राहिल शाह यांच्या संगीत सेरेमनीत आली होती. या संगीत सेरेमनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होतााना दिसत आहे. अनन्या तिची मैत्रीण सारा अली खानच्या आँख मारे या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सध्या अनन्याचा हा व्हिडीओ सोशलवर चर्चेत आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, अनन्या पांडे आँख मारे गाण्यावर त्याच गाण्याच्या सिग्नेचर स्टेप करत आहे. फॅशन डिझायनर तरूण तहलानीनं डिझाईन केलेल्या ब्लॅक लेहंग्यात डान्स करणाऱ्या अनन्याचा हा अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या डान्सचं आणि लुकचं कौतुक केलं आहे. अनेक चाहत्यांनी अनन्याच्या व्हिडीओवर कमेंट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. सारा आणि अनन्या एकाच शाळेत शिकल्या आहेत.

दोघींबद्दल यापूर्वीही अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अनेकदा सारा आणि अनन्या एकत्र स्पॉट झाल्या आहेत. असंह म्हटलं जात आहे की बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनवरून दोघींमध्ये तणाव राहिला आहे.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या अनन्या पांडे मकबूल खानच्या खाली पीली या सिनेमच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अनन्या ईशान खट्टर सोबत काम करताना दिसणार आहे.