‘नेपोटीजम’वर अभिनेत्री अनन्या पांडेचं पुन्हा एकदा भाष्य ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अनन्या पांडेनं नेपोटिजमवर भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसला ज्यामध्ये ती स्ट्रगलबद्दल बोलताना दिसली होती. परंतु आता मात्र तिचं म्हणणं आहे की, स्टारकिड असण्याचा फायदा मिळतो. फिल्मी घराण्यातून असल्या कारणानं तुम्ही सहज लोकांच्या संपर्कात येऊ शकता असं ती म्हणाली आहे. सोबतच तिनं जान्हवी कपूर तिची टफ कंपीटीटर आहे असंही सांगितलं आहे.

स्टारी नाईट्स जेन वाय शोमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अनन्या म्हणाली, “मी आता या गोष्टीशी सहमत आहे की, स्टारकिड असल्याचा फायदा मिळतो. आपण इंडस्ट्रीतील लोकांशी सहज संपर्क साधू शकतो. आपण त्यांच्यामध्ये लहानाचं मोठं होत असतो. मला माझ्या वडिलांचा खरंच गौरव करावा वाटतो आहे.”

अनन्यानं सांगितलं की, बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिची सर्वात मोठी कंपीटीटर आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खानकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असंही ती म्हणाली. तिला सुहानाचं डान्सिंग आणि अ‍ॅक्टींग स्कील शिकायला आवडेल असं तिनं सांगितलं.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत आपल्या एका सिनेमाला घेऊन सध्या ती चर्चेत आहे. या सिनेमाचं नाव फायटर आहे. दोघंही या सिनेमाबद्दल खूप एक्सायटेड आहेत. याशिवाय अनन्या ईशान खट्टर सोबत खाली पीली या सिनेमात काम करताना दिसणार आहे. मकबूल खान दिग्दर्शित हा सिनेमा 12 जून 2020 रोजी रिलीज होणार आहे.