‘अंग्रेजी मीडियम’, ‘गुंजन सक्सेना’ आणि ‘रूफी आफ्जा’ या सिनेमांच्या रिलीज डेट बदलल्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार इरफान खान आणि करीना कपूर यांचा अंग्रेजी मीडियम, जान्हवी कपूरचं बायोपिक गुंजन सक्सेना आणि राजकुमार राव व जान्हवी कपूर यांचा रूफी आफ्जा या सिनेमांची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. या तीनही सिनेमांच्या नव्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

फिल्म क्रिकीट आणि ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्शनं याबाबत ट्विटरवरुन ट्विट शेअर करत माहिती दिली आहे. तरणनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “करण जोहर आणि दिनेश विजान यांनी आपल्या आपल्या सिनेमंच्या रिलीज डेट बदलल्या आहेत. अंग्रेजी मीडियम आता 13 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे. जान्हवी कपूर स्टारर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असणारा सिनेम गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल हा सिनेमा 24 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे. तसेच राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा रूफी आफ्जा हा सिनेमा 5 जून 2020 रोजी रिलीज होणार आहे.”

अंग्रेजी मीडियम हा सिनेमा आधी 20 मार्च रोजी रिलीज केला जाणार होता. परंतु आता हा सिनेमा 7 दिवस आधीच रिलीज होणार आहे. होमी अदजानियानं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.

जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना हा सिनेमा आधी 24 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे. रूफी आफ्जा हा सिनेमा 5 जून 2020 रोजी रिलीज केला जाणार आहे.