Video : सुशांत सिंह राजपूतची Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘First Kiss’ व्हिडीओ ! चाहत्यांनी व्यक्त केला ‘संताप’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यानं दि 14 जून 2020 रोजी (वार- रविवार) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. पवित्र रिश्ता मालिकेत त्याच्यासोबत काम करणारी आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही त्या काळात सतत चर्चेत येताना दिसली. सुशांतच्या निधनानंतर ती सतत त्याच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिनं लक्ष वेधलं होतं. त्या कठिण काळात ती सुशांतच्या कुटुंबीयांना आधार देतानाही दिसली होती. सध्या अंकिता तिच्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. यात ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. चाहते तिचा हा अंदाज पाहून हैराणही झाले आहे आणि संतापले आहेत.

अंकितानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केल आहे यात ती रॅपर हनी सिंग (Honey Singh) च्या फर्स्ट किस (First Kiss) गाण्यावर लिप्सिंग करत खास एक्सप्रेशन देताना दिसत आहे. अंकिताचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना व्हिडीओ आवडला आहे तर काहींनी मात्र संताप व्यक्त केला आहे. सुशांतच्या चाहत्यांना वाटत आहे की, फक्त 6 महिन्यात ती सुशांतला विसरली आहे. अनेकांनी यावर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.

एकानं यावर कमेंट करत लिहिलं की, अंकिता लोखंडेला बॉयकॉट करा. आणखी एकानं लिहिलं की, तू सुशांत सिंह राजपूतला विसरलीस का? एकजण म्हणाला, सुशांतला जाऊन 6 महिने झाले परंतु अंकितानं एकही पोस्ट शेअर केली नाही. जास्त करून युजर्स तिला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत.